Friday, December 30, 2011

Best 2012 Marathi Jokes Collection

January Month 2012 best and Funny pictures collection watch and take a more enjoy with team as will as father,mother,health and Beggar jokes as will as Happy News year Boy and gilrs friends jokes watch in this site















Tuesday, December 27, 2011

What is वडिलांचे प्रेम Read and Share

Heart Touching Marathi Article
---------------------------------------------------

तो बाप असतो

चांगल्या शाळेमध्ये
पोरांना टाकायची धडपड करतो
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
.................................तो बाप असतो
कॉलेज मध्ये सोबत जातो,होस्टेल शोधतो
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
....................................तो बाप असतो
स्वतः टपरा mobile वापरून,तुम
्हाला stylish mobile घेऊन देतो
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
....................................तो बाप असतो
lovemarriage करायला कोणी निघाल
तर खूप चिडतो
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप
ओरडतो
"बाबा तुम्हाला काही समजत का? "अस
ऐकल्यावर खूप रडतो
................तो बाप असतो
जाताना पोरगी सासरी,धायमोकळून
रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
..............तो बाप असतो.
वडिलावर खूप कमी कविता असतात म्हणून
कविता लाईक करून शेयर पण
करा.............आणि वडिलांचे प्रेम जगाला कळू
द्या


: Source : Facebook.com 

Thursday, December 22, 2011

Heart Touching Marathi Poem आई फ़क्त तुझ्यासाठी


 आई फ़क्त तुझ्यासाठी.......
बांधून मनाशी खुणगाठी
निघालो धावत स्वप्नांपाठी
कचरते मन, अडखळते पाउल
आई फ़क्त तुझ्यासाठी.......


कशी राहशील सोडून मला
सतावेल आठवण क्षणाक्षणा
रडन्यासाठी तुला आता
न लागेल कांद्याचा बहाणा


बस stop वर तुझा हात सोडवताना
माझं उसणं अवसाण...गळून गेलं होतं
शेवटच्या क्षणी जर बाबांनी तुला माघे खेचलं नसतं...
त्या बस च  एक सीट नक्कीच रिकामं गेलं असतं...


प्रत्येक वेळी तुला फोनवर बोलताना
गळा अगदी दाटून येतो.....
थांबवून हुंदका कसाबसा मी..
balance संपल्याचा बहाणा करतो..
कळुन ही न कळल्यासारखी तू..
मग माझंच सांत्वन करतेस...
पण मलाही माहित आहे आई..
फोन ठेवताच तू रडतेस...


इथे रोज pizza आणि burger खाताना...
तुझ्या भाकर भाजीची आठवण येते..
अशी तुझी आठवण काढून जेवताना मग..
का कुणास ठावूक..प्रत्येक गोष्ट खारटचं लागते...


ऑफिसातुन थकुन घरी आल्या नंतर, तोंडातून
"आई चहा दे गं " अगदी सहज निघून जातं
आणि तू इथे नसल्याचं लक्षात येताच...
घर अगदी भकास भकास वाटू लागतं...
चहा पिण्याची इच्छा जाते मरून...
शरीर बोजड अन मन खिन्न खिन्न होतं.....


थकलेलं माझं शरीर, लगेचच...
स्वताःला निद्रेच्या ताबी देतं...
सताड जागं माझ मन मात्र, तुझा ..
केसांतून फिरणारा...गोंजारणारा हात शोधत राहतं...


सकाळी उठल्यानंतर पुन्हा मगं
माझी रोजचीच धावपळं सुरू होते...
आणि मग मनात विचार येतो...
तू असलीस की सर्व कसे सुरळीत होते...


अशा या माझ्या busy दिनचर्येत...
तुझी उणीव जाणवत राही क्षणोक्षणी
धावत येईन परत तुझ्यापाशी आई,
पहिली संधी मला मिळता क्षणी....


सरतील दिवस बघता बघता
परत येईन मी तुझ्याचपाशी...
ठेवून पायावर डोई, मागेन तुझी माफ़ी
सोडून तुला नाही जाणार.मी .पुन्हा कधीही  ....

Friday, December 16, 2011

एसटी झाली स्मार्ट Card Ticket Service

इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन' (ईटीआयएम) योजनेतंर्गत 'स्मार्ट कार्ड' योजनेचा शुभारंभ गुरूवारी झाला. चार आणि सात दिवसांचे पास घेणा-या प्रवाशांसाठी ही स्मार्ट कार्ड योजना राबवण्यात आली असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने विद्यार्थी, मासिक, त्रैमासिक पास आदींसाठी ती लागू करण्यात येणार आहे. 

या स्मार्ट कार्डमुळे कागदी पास फाटणे, खराब होणे किंवा त्याचे दुरुपयोग होण्याचे प्रमाण पूर्णपणे टळणार आहे. त्याउलट स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांनाही ते सांभाळणे अधिक सोपे जाणार आहे. सध्या ही योजना 'आवडेल तिथे प्रवास' (चार किंवा सात दिवस प्रवास) करणा-या प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. स्मार्ट कार्डसाठी २५ रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार.

Latest Marathi Funny Joke Collection in December Month

Latest Update New Funny Joke Collection in December Month 
-------------------

न्यूटनच्या बायकोचा उखाणा- 


आईला पाहून बाळ खुदुखुदू हसलं... 


डोक्यावर पडलं सफरचंद, 


तर खायचं सोडून येडं शोध लावत बसलं! 
-------------------------------------------


गंपू : काय रे, तू हॉस्पिटलमध्ये लेडीज वॉर्डमध्ये काय दाखल झालास? लाज नाही वाटतं?


झंपू : त्यात काय लाज वाटायची? माझा जन्मच लेडीज वॉर्डमध्ये झाला होता! 
---------------------------------------------------
संता : ओय, हा मोबाइल फोन तर मला कंगाल करून टाकणार. 


बंता : का रे, काय झालं? 


संता : अरे, दोन दिवस गेले की मेसेज येत रहातो 'बॅटरी लो' म्हणून. घेतल्यापासून ५६ वेळा बॅटरीज बदलल्या आहेत. आणखी किती वेळा बदलू?
---------------------------------------------------
डॉक्टर : काय हो? बऱ्याच दिवसांनी आलात? 

गंपूशेठ : हो, जरा बरं नव्हतं!! 
---------------------------------------------------
बायको : तुम्ही किती मूर्ख आहात, ते बघण्यासाठीच मी तुमच्याशी लग्नं केलं. 

चिंटूमल : अगं, मी तुला लग्नाची मागणी घातली ना.. खरंतर तेव्हाच माझा मूर्खपणा तुझ्या लक्षात यायला हवा होता. 
---------------------------------------------------
Source maharashtratimes.indiatimes.com

ideal tips for Entrance Exam in Marathi

Best ideal tips for Entrance Exam in Marathi Language 2011 each Entrance exam tips read in this site.


एण्ट्रन्स एक्झामची तयारी करताना प्रत्येक विषयाला वेळ द्या. अभ्यासात सातत्य ठेवा. त्यातल्या संकल्पना समजून घ्या. परीक्षेतले प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. ते सोडतवाना वेग आणि अचूकतेचं महत्त्व जाणा. सोप्या प्रश्नांची उत्तरं आधी सोडवा, अशा अनेक टिप्स 'आयडियल'च्या तज्ज्ञांनी एमबीए, सीए आणि इंजिनीअरिंगच्या एण्ट्रन्स एक्झामिनेशन देऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना दिल्या


ऑल इंडिया इंजिनिअरिंग एण्ट्रन्स एक्झामिनेशन (एआयईईई)बद्दल मार्गदर्शन केलं. ही परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन पद्धतीने देता येते. दोन्ही पद्धतींचे आपापले फायदे आहेत, असं सांगून त्यांनी एआयईईईला कसं समोरं जायचं, याबाबतही मार्गदर्शन केलं. एमबीए-सीईटी देताना अंदाजाने उत्तरं लिहू नका. तसंच कुठल्याही प्रश्ानचा शॉर्टकट नसतो, असं प्रो.विवेक सारडा यांनी सांगितलं. सीए-सीपीटीमध्ये भरपूर कॅलक्युलेशन्स असतात, हा समज तितकासा योग्य नसल्याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष वेधलं. कॅलक्युलेशन्स करण्याच्या आणि कॅलक्युलेटर हाताळण्याच्या शॉर्ट टेक्निक्सही त्यांनी शिकवल्या. 


Source : Maharashtratimes.indiatimes.com

Rose love Story 2011


एक होत फुल....एक होता काटा,
दोघांचा एकमेकांवर जीव मोठा होता.



...सुंदरशा फुलाला कुणी तोडू पाही,
काटा मात्र त्याचे रक्षण करीत राही.


एक दिवस असा आला फुल शेवटी तुटलेच,
काट्यालाही त्याचे फार वाईट वाटले.


काट्याने समजावले स्वत:ला,
फुल शेवटी दुसऱ्याचेच धन,
का बरे रडते त्या साठी माझे मन?

Wednesday, December 7, 2011

Real Marathi Girls Love on Poor Boys


एक गरीब प्रियकर
त्याच्या श्रीमंत
प्रेयसीला म्हणतो :- जर
मी अजून गरीब
झालो तरी तू
... मला स्वीकारशील ?
श्रीमंत प्रेयसी :-
मी तुझ्यासाठी च
बनली आहे !!
गरीब प्रियकर :- जर
कोणी श्रीमंत
मुलगा आला आणि त्याने
तुला लग्नासाठी
मागणी घातली तर ?
... श्रीमंत प्रेयसी :-
मला खात्री आहे कि तो तूच
असशील !!


Love is not only an
emotion but an eternity
too ....... keep loving purely



Monday, December 5, 2011

ओरिजिनल मोबाइल कसा ओळखायचा? How to find Original Mobile

How to find Original Mobile

मला सॅमसंग वेव्ह ५७५ थ्रीजी हा मोबाइल घ्यायचा आहे. मला ३.२ मेगापिक्सेल कॅमेरा, थ्रीडी साऊंड आणि थ्रीजी हेच हवे आहे. हा मोबाइल खरच चांगला आहे का? तसेच तो ओरिजिनल कंपनीचाच आहे हे कसे ठरवू शकतो? मोबाइल घेताना बिलासंदर्भात कोणती काळजी घेऊ?

Best Ans : या मोबाइलचा परफॉर्मन्स चांगला आहे. अद्याप कोणत्याही प्रकारच्या तक्रारीची नोंद नाही. यामुळे तुम्हाला आवडला असेल तर हा घेण्यास काहीच ना नाही. मोबाइल ओरिजिनल कंपनीचा आहे का? हे तपासण्यासाठी तुम्ही आयएमईआय नंबर व्हेरिफाय करणे गरजेचे आहे. तुमच्या मोबाइलवर *प्त०६प्त टाइप केलं की, तुम्हाला १५ आकडी आयएमईआयनंबर मिळेल. हा नंबर मेसेजमध्ये टाइप करून तो ५३२३२ किंवा ५७८८६ वर एसएमएस करा. यानंतर तुम्हाला आयएमईआय नंबर चेक फोन इज जेन्युइन सॅमसंग फोन असा मेसेज येईल. जर तो मोबाइल ओरिजिनल नसेल, चोरलेला असेल, सेकंड हॅण्ड असेल तर त्या संदर्भातील माहिती मिळेल. बिल घेताना पक्के बिल घ्या. त्यावर दुकानदाराचा व्हॅट नोंदणी क्रमांक असल्याची खात्री करा. रकमेवर व्हॅट लावलाय का ते तपासा आणि बिलावर बॉक्सवरील मॉडेल नंबर, आयएमईआय नंबर लिहून घ्या.

Link from Mata

A poor boy loved a rich girl


A poor boy loved a rich girl.
One day the boy proposed her. Then the girl said, "listen! your monthly salary is my daily hand expenses. Should I be involved with you? How could you thought that? I will never love you. So, forget me 'n get engaged with someone else of your level."


But somehow the boy could not forget her so easily.


10 years later.


One day they became face to face in a shopping center. The lady said, "Hey! you! How are you? Now I'm married. Do you know how much is my husband's salary? Rs. 2 lac per month! Can you imagine? 'n he is also very smart."
The guy's eyes got wet with tear by hearing those words.
After few minutes her husband came before the lady could say something to the guy, her husband started to say by seeing the guy.
"Sir! You here? Meet my wife." Then he said to her wife, "I'm going to assist a project of sir, which is of Rs. 200 crore. 'n do u know a fact? Sir loved a girl but he didn't get her. That's why still he is unmarried. How much lucky the girl was. Isn't it? Now a days who can love like that way?"
Moral: Life is not so short. So, don't be so proud of yourself and damn others. Situations change with time. Every one should respect other's love.
Source from : facebook.com

FDI Best Option for Indian Member

Are you agree for FDI ? 


किराणा मालासह रिटेल उद्योगात विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. या संदर्भात बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी संसदेत अधिकृत घोषणा करतील. मुखर्जी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांना फोन करुन ही माहिती दिली. याआधी केंद्रातील प्रमुख घटक पक्ष असलेल्या तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये मीडियापुढे एक घोषणा करुन सरकार रिटेलप्रश्नी माघार घेणार असल्याचे जाहीर केले होते. 



संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून काम ठप्प झाले होते. भ्रष्टाचार आणि रिटेलमधील विदेशी गुंतवणुकीच्या मुद्यावरुन विरोधकांनी कामकाज बंद पाडले होते. केंद्र सरकारने वारंवार बैठका घेऊन देखील तोडगा निघत नव्हता. त्यामुळे संपूर्ण अधिवेशन चर्चेविना संपण्याचा धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर अखेर केंद्र सरकारनेच माघार घेतली आहे. 


विरोधक आणि सहकारी घटक पक्षांच्या दबावामुळे काँग्रेसने आपल्या भूमिकेत बदल करत रिटेल उद्योगातील विदेशी गुंतवणूक लांबणीवर टाकली आहे. चार दिवसांच्या सुटीनंतर बुधवारी संसदचे अधिवेशन पुन्हा सुरू होत आहे. त्यावेळी अर्थमंत्री रिटेलप्रश्नी सरकारची नवी अधिकृत भूमिका जाहीर करतील. 


Source : Maharashtra.indiatimes.com


Marathi Magic Boll Jokes


गंपू : आई... मला आज हरवलेला बॉल सापडला. 


आई : कशावरून तो हरवलेला आहे? 


गंपू : ती बघ... ती मुलं तिकडं शोधताहेत. 

****************************

चौघांजणांचं एक कुटुंब खरेदीसाठी इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये शिरलं. 

दुकानदाराने विचारलं, 'बोला, काय हवंय तुम्हाला?' 

आई म्हणाली, आयफोन 

मुलगा म्हणाला, आयपॅड 

मुलगी म्हणाली, आयपॉड 

सर्वात शेवटी बाबा म्हणाले, 'आय पेड' 
--------------------------------------

Funny Marathi Shop Jokes in 2011
-----------------------------------------

Friday, December 2, 2011

जगातले पहिले सेक्स कॉलेज ऑस्ट्रियात


ऑस्ट्रियात चक्क जगातील पहिले सेक्स कॉलेज सुरू झाले आहे.... सेक्स या सर्वांच्याच आवडीच्या विषयात डिप्लोमा कोर्स करण्याची संधी या कॉलेजमध्ये असून, संबंधित व्यक्तीने वयाची १६ वर्षे पूर्ण केलेली असावी, एवढीच माफक अट सेक्स कोर्ससाठी घालून देण्यात आली आहे.

ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे सुरू झालेल्या या जगातील पहिल्याच सेक्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना हॉस्टेलवरच रहावे लागणार आहे. प्रत्येक खोलीत एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थीनी अशी खास व्यवस्था याठिकाणी असेल.

आम्ही सेक्सचे शास्त्रोक्त ज्ञान देणार आहोत. या विषयावर सातत्याने होणारे संशोधन, सेक्स टीप्स याबाबतची माहिती देणार आहोत, असे कॉलेजच्या प्राचार्या वाय. एम. थॉम्पसन यांनी सांगितले. कोर्ससाठी आम्ही विशेष पुस्तके तयार केली आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला ही सुमारे १.२ लाख रुपयांची पुस्तके विकत घ्यावी लागतील, असेही त्या म्हणाल्या.

Funny Marathi Book Jokes


गंपू : मला बंडूचं पुस्तक परत द्यायचंय. पण धीर होत नाही.

झंपू : का?

गंपू : अरे, ते सापडत नव्हतं आणि आता सापडलं आहे.

झंपू : मग काय अडचण आहे? देऊन टाक लगेच.

गंपू : मी दोन दिवसांपूर्वीच त्याला पटवून दिलं की, मी ते पुस्तक घेतलंच नव्हतं. आणि ते त्याला पटलंही होतं!!

------------------------

Marathi Girl Friend Shayree
--------------------------

एका तरुणाची शायरी

एक बेवफा की याद में, हमने जाम उठा लिया...

और फटाफट ब्रेड पे लगा के खा लिया!

तात्पर्य : सगळेच प्रेमी निराश नसतात!
-------------------------------

डॉक्टर : (बराच वेळ पेशंटचा घसा, कान, नाक तपासल्यानंतर) हं... टॉर्च चांगला आहे!


Thursday, November 17, 2011

What is Current Situation in Maharashtra

We wrote What is Current Situation in Maharashtra . ( in Daily Life )
*****************************************
*****************************************
*****************************************
*****************************************
*****************************************

*****************************************
*****************************************
*****************************************


Thanks for Visit : For continue Reading >>>>>>




Funny Marathi Jokes in Wedding period


मुला कडचे : आम्हाला स्थळ पसंद आहे .
मुली कडचे : पण , अजून आमची मुलगी शिकत आहे .
मुला कडचे : मग आमचा मुलगा काय लहान आहे , पुस्तक फाडायला .... :)


------------------------



मुलगी:- आपण लग्न कधी करायचे?
मुलगा:- घरी विचारूनसांगतो.
मुलगी:- तुझे माझ्यावर जास्त प्रेम आहे कि घरच्यांवर?
मुलगा:- घरच्यांवर
मुलगी:- का?
... ... मुलगा:- मी जेव्हा लहान होतो तेव्हा, चालताना पडलो कि आई उचलयाची, बाहेर
जायचो तेव्हा पप्पा बोट पकडायचे, रडायला लागलो तर ताई आणि दादा त्यांची
खेळणी द्यायचे. कळले का
मुलगी:- पण घरातून बाहेर पडल्यावर त्यांच्या कडे न जाता माझ्याकडेच येतो ना रे माकडा.





Best Marathi Language in English Jokes


मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.इंग्रजीचे सर ओरडले."व्हाय आर यू लेट?"इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, "सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला."सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...
हजरजबाबी मन्याने म्हटले,"सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. ह...ी मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!"
--------------------------------------------------


Modern Mobile Jokes in Marathi

--------------------------------------------------

इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट

हिंदी मा म्हणते शुभ रात्री

मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर

आणि आपली मराठमोळी आई म्हणते, अरे आग लाव त्या मोबाईलला आणि झोप आता.

--------------------------------------------------


पक्क्या : काय रे एवढ्या हळू आवाजात कोणाशी बोलतो आहेस?

मंग्या : अरे बहिणीशी रे …

पक्क्या : अरे मग एवढ्या हळू आवाजात बोलायची गरज काय ?

मंग्या : बहिण तुझी आहे….
----------------------------------------------------



Auto jokes in marathi


रिक्षावाला : कुठे जायचंय? 


ठमाबाई : कुठे नाही! पण आमचा बाळू रडतोय.. जरा हॉर्न वाजवून दाखवा की!! 
-----------------------

गंपूला रस्त्यात हरवलेला मोबाइल मिळतो. तो मालकाला परत करावा, या उद्देशाने गंपू मोबाइलमधले काँटॅक्ट तपासतो आणि 'होम' नावाने सेव्ह केलेल्या नंबरवर फोन करतो. 


गंपू : अहो, तुमचा हरवलेला मोबाइल मला सापडलाय... 


पलिकडचा माणूस (वैतागून) : अहो, मिस्ड कॉल द्यायचा ना! दोन रु. बॅलन्स होता, त्यातलाही एक रुपया संपला! 
------------------------------------------
Funny Marathi Jokes in Hotel 
----------------------------

वेटर : साहेब, तुम्ही मसाला डोशातली फक्त भाजी का खाताय? 


गंपू : डॉक्टरांनी सांगितलंय, बाहेरचं खाऊ नका!! 




Monday, October 31, 2011

Heart Touching My Marathi Poem 2011



हो मला प्रेम कधी जमलेच नाही
तिच्या शिवाय मन माझ कशात रमलच नाही!१!

माझ्या मनात
सारखा तिचाच विचार
तिच्या, मात्र मित्रांशी
फोनवर गप्पाच फार!२!

तिला हसवण्यासाठी करायचो
मी जीवाचे रान,
ती म्हणते कशाला देतोस
मला फुकटचा त्राण!३!

तिला खरचटले तरी
व्हायचा हृदयावर घाव,
ती म्हणते कशाला आणतोस
चेहऱ्यावर काळजीचा आव!४!

फोन करायचो तिला
वाटायची तिची काळजी,
ती म्हणते परीक्षा असून फोनवर बोलतोस
असा कसा तू निष्काळजी!५!

तिला सांगायला गेलो
माझे आहे तुझ्यावर प्रेम,
ती म्हणते तुझे नाही का
आयुष्यात कोणते aim!६!

तिला वाढदिवसाला भेटायला गेलो
भर उन्हात तापत,
ती म्हणते, मी मित्राच्या
घरी आहे केक कापत!७!

३वर्षे झाली आज, मी
गुजरातला नोकरी करत आहे,
माझ्या प्रेमाशिवाय मी
एकाकी जीवन जगात आहे!८!

काल आठवण आली म्हणून
तिच्या घरी रिंग केली,
तिच्या आईकडून मला
वेगळीच बातमी कळली!९!

मी जायच्या दुसरया
दिवशीच ती आजारी पडली,
अन माझ्या विरहाच्या
तीव्र दुखानेच देवाघरी गेली!१०!

तिचे अव्यक्त शब्द कळलेच नाही
तिच्या मनातील भाव ओळखलेच नाही
तिच्या डोळ्यातील प्रेम जाणलेच नाही
म्हणून, मला प्रेम कधी जमलेच नाही!११!
मला प्रेम कधी जमलेच नाही.......!!!

Heart touching Love Story in Marathi


लाख वाटल लपवाव जगापासुन या मनाला
तरीही आज तुझी कहाणी कळाली या जगाला
सगळ्यांनी वाचल दुःखं या प्रत्येक शब्दांतुन
काय लपवु राहीलयं काय आता लपवायला.

लाख मन सागंत होत कुठेतरी थाबांयला
वळण निघुन गेली नाही जमल वळायला
सारेच धावले एकदम सुखाच्या मागे
मी काय करु मला नाही जमल पळायला.

आज काय झाल तुला उगाच असं रडायला
कुठे चुकल्यासारखं नाही ना वाटत मनाला
अशी कीती सुखं तुझ्या पदरात पडली
जी कारणं होती तुझी तेव्हा मला सोडायला.

आजही कुठे जमतय मला तस जगायला
एक वणवा कमीच होती मला जळायला
कालच्या पुरातून कसाबसा वाचलो मी पण
डोळ्यातल्या पाण्यात नाही जमत पोहायला.

What is Interest for Saving Account from GOVT Bank


सेव्हिंग अकाउंटवरील व्याजदर नियंत्रण मुक्त करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने नुकताच घेतला . याचा फायदा सेव्हिंग अकाउंटवर रक्कम अधिक काळ ठेवणाऱ्यांना होण्याची शक्यता बँकिंग तज्ज्ञांनी वर्तविली आहे . रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे स्पर्धा वाढणार आहे . सेव्हिंग अकाउंटवर अर्धा ते एक टक्का अधिक व्याज मिळण्याची शक्यताही वर्तविली जात आहे . अधिक ग्राहक मिळविण्यासाठी बँकांकडून वाढीव व्याजदराचे गाजर ग्राहकांना दाखविले जाण्याची शक्यता आहे . 

महागाई आणि आपण


दूध, साखर आणि तूप यांच्या किमती वाढल्या आहेत. दिवाळी तोंडावर आली असल्याने विविध प्रकारचे गोड आणि तिखट पदार्थांची रेलचेल असेल. अशा ऐन मोक्याच्या वेळी महागाईचे सावट निर्माण झाले आहे. वाढत्या चलनदरामुळे यंदाचा सण महागडा ठरण्याची शक्यता आहे. एकंदरित वस्तू आणि सेवांचे दर वाढत आहेत. महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी रिर्झव्ह बँक प्रमुख व्याजदरात वाढ करण्याचे आक्रमक धोरण अवलंबत आहे.

' होलसेल प्राइस इंडेक्स' 'कन्झ्युमर प्राइस इंडेक्स' आणि अन्नधान्यातील चलदरवाढ हे चलदरवाढीचे तीन आयाम आहेत. चलनदरवाढीतून पैशांचे मूल्य प्रतित होते. विविध कमॉडिजीवरून ते मोजले जाते. अन्नधान्य हा त्यातला एक भाग झाला. बाकीच्या घटकांचे भाव घसरले आणि अन्नधान्याच्या किमती वाढ होत तराहिली तरी चलनदरात एकंदर घट दिसून येईल. विशिष्ट कालावधीत किती वाढ झाली ते मोजले जाते. जसे की, गेल्या वषीर् एक किलो टॉमेटोचा दर ३० रुपये असेल आणि यंदा तो ३२ रुपये झाला असेल तर चलनदरातील वाढ ६.६६ टक्के असू शकते.

ग्राहकांवरील परिणाम

अन्नधान्यासारख्या प्राथमिक गरजांसाठीची मागणी किमतीच्या बाबतीत अलवचिक असते. म्हणजे, वाढत्या किमतीचा मागणीवर फारसा परिणाम होत नाही. या गरजांमध्ये एका मर्यादेच्या पुढे कपात करता येत नसल्याने अन्नधान्याच्या किमती वाढल्या तरी त्यावर खर्च करावाच लागतो आणि त्यामुळे आपल्या बचतीवर परिणाम होतो.

Thursday, October 20, 2011

My Love Story in Marathi


६ लाच आला फोन जिग-याचा , "जरा बोलायचंय तुझ्याशी , बसायचंऽ का ? "
मी : "ठीक आहे ". काम तर नव्हतं आता काहीहीऽऽऽ....

गेलो जवळच्याच BAR मध्ये, कोप-यातच बसलो
जिग-या : काय घेणार ? , मी : चालेल यार , Whisky ,Vodka काहीहीऽऽऽ....

Order दिली. RC ,सोडा . ग्लास भरला
सुचत नव्हतं आता काहीहीऽऽऽ....

ब-याच दिवसानंतर बसलो होतो
पहिलाच पेग "Top to Bottom ". ऐकणार नव्हतो आता काहीहीऽऽऽ....

दोन पेग झाले , "Gold Flake " सुलगावली
हं.. आता बोल काहीहीऽऽऽ....

जिग-या : तुझी ती भेटली होती , लग्न झालं तिचं.
मी : अरेऽऽ , यार काय म्हणतॊस ? माहित नाही काहीहीऽऽऽ....

जिग-या : अरे , Facebook वर बघितले नाही का ?
फोटो टाकलेत इकडचे तिकडचे ....काहीहीऽऽऽ....

मी : च्यायला .. मनातलं मनातच राहिलं
बोललोच नाही तिला काहीहीऽऽऽ....

मी : तिचं होतं यार माझ्यावर .. मला माहितेय
जरी बोलली नाही ती काहीहीऽऽऽ....

मी : खूप प्रयत्न केला होता बोलायचा
पण जमलंच नाही यार काहीहीऽऽऽ....

जिग-या : मला माहितेय यार. सोड आता. ती एकच आहे का या जगात ?
मनात आणू नकोस आता विचार काहीहीऽऽऽ....

मी : पण असं कसं विसरणार तिला , पहिलं प्रेम माझं
तुला नाही कळणार यार , माझ्या मनातलं काहीही....

मी : अरे आपले कवी म्हणतात ना
" प्रेम कर भिल्लासारखं बाणा वरती खोचलेलं"

जिग-या : पण बाण एकाच "दिला" वर मारायचाय
हे म्हणाले नाहीत काहीहीऽऽऽ....

जिग-या : यार आपल्याला एवढंच कळतं
आपली हीच प्रेयसी - ग्लासातली ..
भर पुढचा पेग , होऊ दे "Cheers"
तुझ्या लव्हसाठी , प्रेमासाठी वैगरे .. काहीहीऽऽऽ....

एक "Quarter" झाल्यानंतर आलो खरा शुद्धीवर
ठरवलंच , पुन्हा नाही आता प्रेम वैगरे .. काहीहीऽऽऽ....

Famous Lakshmikant Berde Songs Collection

Famous marathi actor Lakshmikant Berde popular Marathi songs collection watch Live video in this site with 1200 Lakshmikant Berde Video famous collection Below..
Funny Lakshmikant Berde songs 




Famous Lakshmikant Berde Songs Collection 
Prem Kalis Tu Maajhi Jahalis - Laxmikant Berde, Maskari Song
Old Famous Lakshmikant Berde Songs Collection 

Lovely Marathi Jokes for Christmas


मुलगी:- आपण लग्न कधी करायचे?
मुलगा:- घरी विचारूनसांगतो.
मुलगी:- तुझे माझ्यावर जास्त प्रेम आहे कि घरच्यांवर?
मुलगा:- घरच्यांवर
मुलगी:- का?
... ... मुलगा:- मी जेव्हा लहान होतो तेव्हा, चालताना पडलो कि आई उचलयाची, बाहेर
जायचो तेव्हा पप्पा बोट पकडायचे, रडायला लागलो तर ताई आणि दादा त्यांची
खेळणी द्यायचे. कळले का
मुलगी:- पण घरातून बाहेर पडल्यावर त्यांच्या कडे न जाता माझ्याकडेच येतो ना रे माकडा.
:) :)

***********************************************


मनी असे ते स्वप्नी दिस ओठी मी हे आणू कसे
...माझी नववधू शब्दात मी हे सांगू कसे
निळे पाणी, निळे डोगर, हिरवे हिरवे रान,
.... चे नाव घेउन राखतो सर्वांचा मान
काही शब्द येतात ओठातून
काही येतात गळ्यातून
राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून
भाजित भाजि पालक,
...माझि मालकिन अन् मि मालक !
खोक्यात खोका टि वी चा खोका,
खोक्यात खोका टि वी चा खोका
.......माझी मांजर मि बोका..
उमाचा महादेव आणि सितेचा राम
... आलि जीवनी आता आयुषयभर आराम
पुणे तेथे नाही काही उणे,
.... गेले गावाला तर घर होते सुणेसुणे
अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला,
....चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला
मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी
पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
........ ची व माझी जडली प्रिती

Tuesday, October 11, 2011

Marathi Happy New Year SMS for Girl Friend 2011

Marathi Happy New Year SMS for Girlfriend 2011

एक प्रेमीयुगुल आत्महत्या करायचं ठरवतात, मुलगा पहिले उडी मारतो, पोरगी डोळे मिटते, आणि मागे फिरते.....ते बघून पोरगा पाठीवरचं पॅरेशूट उघडतो आणि म्हणतो, साली चेटकीण मला माहित होत ही उडी नाही मारणार ..............
.
.
त्या दिवसापासून लोकं म्हणू लागले

......LADIES FIRST..

-------------------

तुझ्याविना दिवस माझे
काही केल्या सरत नाही
किती समजावाले स्वतःला
तरी अश्रू काही थांबत नाही .

-------------------------------------

प्रत्येक अश्रुचा अर्थ दुःख होत नाही. विरहाने प्रेम कमी होत नाही वेळी अवेळी डोळे ओले होतात कारण कांदा कापल्याशिवाय भाजी होत नाही.

-----------------------------------------


What is Love Definition in Marathi

हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी
आणि लग्न होणार असलेल्यांनी ......

नक्कीच वाचा: विचार करा.

एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच.

जेवताना मी तिचा हात हातात

घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."

तिच्या डोळ्यांत वेदना उमटली;

तरीही ती शांतपणे जेवत होती,

सगळे शब्द जुळवून मी तीला सांगितलं,

मला घटस्पोट हवाय."

तिने शांतपणे विचारल,- "का?"

तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली.

समोरच ताट तिने भिरकावून दिलं.

लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे,

हे तिल जाणून घ्यायचं होत;

पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलय हे मि तिला

स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो.

माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं:

पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.

दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.

तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि

या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती.....

तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती

आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता.

तिची आणखी एक अट होती.

लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत.

त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती.

मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.

घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता.

त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो.

मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने

बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.

दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती.

आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस

नित बघितलेच नाही हे मला जाणवलं;

आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला.

आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय,

असा प्रश्न पडला.

त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं.

रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां

हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.

दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन

माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच

पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना

नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.

आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती.

जी परत आयुष्यात येत होती.

महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला.

माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले.

ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच नव्हते.

माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.

मी वेगाने CAR चालवत घरी आलो.

माझ्या चेहऱ्यावर हसू होत.

हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो,

तर... माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती.

मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो.

माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता.

ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.

जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही.

आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.

पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.

महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.

वाचा आणि विचार करा. स्वताला विचारा --- "

आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"

या कहाणीचा एकच संदेश आहे.---

" जे आहे-- जे प्रेमात आहे,

जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.

नाही तर पश्याताप...

"आपण किती जरी नाही म्हणालो तरी आपण प्रेमात आंधळे होतोच, तसे आंधळे राहू नका... सावध राहा..कधी काही हि घडू शकत ..!

Tuesday, September 27, 2011

Funny Office Jokes Collection 2011


Guest : तुमच्या ऑफिसमध्ये किती जण काम करतात? 


Office Owner : अर्ध्याहूनही कमी!


------------------------------------------------------


पुणेरी भिका-याची पाटी-

' मी झोपलोय....

नाणी टाकताना आवाज करू नये!!!'

--------------------------------------------


Girl : मी माझी पर्स घरी विसरुन आले आहे आणि मला आता एक हजार रुपयांची गरज आहे.

Boy : अगं त्यात काय एवढं.... मी आहे ना... हे घे..

हे घे ५० रुपये. रिक्षाने घरी जा आणि पर्स घेऊन ये.
---------------------------------------------


Girl Friend : (लाडाने) माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ आणि आयुष्यभरासाठी माझा होऊन जा!!

Friend : बरं झालं, वॉर्निंग दिलीस!!

--------------------------------------------------------




Latest Marathi Jokes 2011 Collection


Sham : दारू पिऊन घरी येतो. कोणाला कळू नये म्हणून लॅपटॉप उघडून बसतो. 


थोड्या वेळाने- 


Sham Father : काय रे गंपू, दारू पिऊन आला आहेस का? 


Sham : नाही हो! 


Sham Father : अरे, मग माझी सूटकेस उघडून काय टाइप करतोयस? 


---------------------------------------------



Ram  इन्कम टॅक्सच्या ऑफिसमध्ये जातो. 






Watchman : तुम्ही इथे कशाला आला आहात..? 


Ram  : मी रात्रंदिवस ज्यांच्यासाठी मेहनत करतो, ते आहेत तरी कोण हे बघायला! 


------------------------------------------------



Friday, September 2, 2011

Funny Girlfriend Joke Collection 2011

Very funny Funny Girlfriend Joke Collection 2011 watch from this site as will as boyfriend Funny Joke Collection
------------------------------



गंपू : प्रिये, तू माझ्या हृदयात, श्वासात, स्वप्नात राहतेस.... 


गर्लफ्रेण्ड : नाही रे... मी अंधेरीत राहते! 
-----------------------------------------------------



गंपू : तू माझ्याकडून १०० रुपये उधार घेतले होतेस... ते कधी परत देणार? 


झंपू : अरे, मी तर ८० रुपयेच घेतलेले. 


गंपू : हो काय? मग थांब २० रुपये पाठवून देतो आणखी! 


-------------------------------------------------------------



शिक्षक : शहामृगाची मान लांब का असते? 


विद्याथीर् : कारण त्याचं डोकं आणि शरीर याच्यामध्ये खूप अंतर असतं. त्यामुळे त्यांना जोडण्यासाठी त्याची मान पण लांब असते. 


--------------------------------------------------


Funny Exam Joke Collection

Funny Exam Joke Collection fuuny Marathi Funny Exam Joke Collection 2011
-----------------

परीक्षेचा पेपर संपल्यावर बंड्या आणि खंड्या भांडू लागले.

सर : काय रे, तुम्ही असे भांडताय का?

बंड्या : बघा ना सर...याने एकही उत्तर लिहिलेलं नाही. अख्खी उत्तरपत्रिका तशीच रिकामी ठेवली असं तो सांगतोय.

गुरुजी : अरे मग, तुला काय फरक पडतोय त्याने?

बंड्या : मग आता मी त्याची कॉपी केलीय असंच तुम्हाला वाटणार ना.
-------------------------------------------------


गंपूला एक हजार रुपयांची एक नोट मिळते. त्याच्यावर लिहिलेलं असतं- हॅप्पी न्यू इयर!

गंपू खिशातली दुसरी नोट काढून तिथे ठेवतो. त्याच्यावर लिहितो- सेम टु यू!

--------------------------------------------------------------------


Father Joke Collection 2011


पुणेरी वडील : तुला यंदा ९५ टक्के मिळाले पाहिजेत.

मुलगा : ९५ काय, १०५ टक्के मिळवून दाखवतो.

वडील : मस्करी करतोस काय?

मुलगा : सुरुवात तुम्ही केलीत!!

---------------------------------------------------------

एका मुलाचं नाव मनमोहन असतं. तो आईकडे जातो आणि म्हणतो, 'आई, मला माझं नाव बदलायचं आहे...'

आई विचारते, 'का रे?'

मुलगा उत्तरतो, 'शाळेत सगळी मुलं मला 'अण्णा आले, अण्णा आले' म्हणून चिडवतात!!'
-------------------------------------------------------


पत्नी : (रागाने) मी आपल्या ड्रायव्हरला नोकरीवरुन काढून टाकणार आहे. आज तिस-यांदा मी मरता-मरता वाचलेय.

पती : अं...मला वाटतं आपण त्याला आणखी एक चान्स द्यायला हवा.


Wednesday, August 24, 2011

New Funny Marathi Teacher Jokes Collection


शिक्षक : हाजीअली कुठे आहे? 


गंपू : वरळीला! 


शिक्षक : प्रभादेवी कुठे आहे? 


गंपू : कालच साताऱ्याला गेली!


---------------------------------------------

शिक्षक : वर्गात जो टाइमपास करायला येत असेल, त्याने उभं राहावं! 


खूप वेळ कोणीच उभे राहात नाही... शेवटी गंपू उभा राहतो. 


शिक्षक : काय रे, तू वर्गात टाइमपास करायला येतोस का? 


गंपू : नाही सर! पण तुम्ही एकटेच उभे होतात, ते बरं नाही वाटलं!! 
--------------------------------------------------

एक मित्र : तुमचा मुलगा तुमच्यावर हात उगारतो? किती लाजिरवाणी गोष्ट आहे... 


दुसरा मित्र : काय करणार? तो आईवर गेलाय! 
------------------------------------------------


Marathi Jokes in Hotels and Motels


वेटर : तुम्ही हॉटेलचे दोन चमचे खिशात टाकलेत! 


गिऱ्हाइक : मला डॉक्टरांनीच सांगितलंय- जेवल्यावर दोन चमचे घेत जा!! 


--------------------------------------------


Funny Marathi Guest Jokes 
--------------------------------------------------



पाहुणे : अरे वा, तुमच्याकडे पुस्तकांचं चांगलं कलेक्शन आहे! आता त्याच्यासाठी एक चांगलंसं कपाट पण घ्या! 


यजमान : अहो कपाट कोणी उसनं देत नाही! 


----------------------------------------------------------------


Funny Wife Definition 
----------------------------------------------------------------
हुशार पत्नी : अशी व्यक्ती जी एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करते की, नवऱ्याला दुसरी बाई परवडूच नये! 
-----------------------------------------------------------------



Thursday, August 11, 2011

New Funny Marathi Joke Collection


पार्टी ऐन रंगात आलेली असते. गंपू एका खुर्चीत बसून बघत असतो. तेवढ्यात डान्सफ्लोअरवरची एक सुंदर मुलगी त्याच्याकडे येऊन विचारते, काय डान्स करणार का?

गंपू : हो!

मुलगी : ठीक आहे, मग तुझी खुर्ची मला दे!!

----------------------------------------------------


संता आणि त्याची बायको आफ्रिकेच्या जंगलात फिरत होते. तितक्यात एक बिबळ्या त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला.

संताची बायको : ओ जी...वाघ आपल्या समोर आहे. लवकर शूट करा.

संता : अगं थांब जरा दोन मिनिटं...कॅमेऱ्याची बॅटरी बदलतो आणि मग शूट करतो.

----------------------------------------------------


गंपू घरी बायकोचा फोटो समोर ठेवून त्याच्यावर चाकू मारत असतो. पण प्रत्येक वेळी त्याचा नेम चुकत असतो. तेवढ्यात बायकोचा फोन येतो. ती विचारते, 'काय क

रतोयस?' गंपू उत्तरतो, 'तुला मिस् करतोय!'

-------------------------------------------------------


गंपू : मेरे पास फेसबुक है , ऑर्कुट है ,

ट्विटर है ... तुम्हारे पास क्या है ?
झंपू : मेरे पास कामधंदा है !!

----------------------------------------------------

Funny Travel Joke in Marathi


पर्यटक म्युझियममध्ये फिरत असतात. 


पर्यटक : हा कोणाचा सांगाड आहे? 


गाइड : हा या भागातल्या राजाचा सांगाडा आहे. 


पर्यटक : आणि हा लहान सांगाडा कोणाचा आहे? 


गाइड : तो राजा लहान असतानाचा सांगाडा आहे! 

Funny Travel Joke in Marathi


पर्यटक म्युझियममध्ये फिरत असतात. 


पर्यटक : हा कोणाचा सांगाड आहे? 


गाइड : हा या भागातल्या राजाचा सांगाडा आहे. 


पर्यटक : आणि हा लहान सांगाडा कोणाचा आहे? 


गाइड : तो राजा लहान असतानाचा सांगाडा आहे!