Monday, October 31, 2011

Heart Touching My Marathi Poem 2011



हो मला प्रेम कधी जमलेच नाही
तिच्या शिवाय मन माझ कशात रमलच नाही!१!

माझ्या मनात
सारखा तिचाच विचार
तिच्या, मात्र मित्रांशी
फोनवर गप्पाच फार!२!

तिला हसवण्यासाठी करायचो
मी जीवाचे रान,
ती म्हणते कशाला देतोस
मला फुकटचा त्राण!३!

तिला खरचटले तरी
व्हायचा हृदयावर घाव,
ती म्हणते कशाला आणतोस
चेहऱ्यावर काळजीचा आव!४!

फोन करायचो तिला
वाटायची तिची काळजी,
ती म्हणते परीक्षा असून फोनवर बोलतोस
असा कसा तू निष्काळजी!५!

तिला सांगायला गेलो
माझे आहे तुझ्यावर प्रेम,
ती म्हणते तुझे नाही का
आयुष्यात कोणते aim!६!

तिला वाढदिवसाला भेटायला गेलो
भर उन्हात तापत,
ती म्हणते, मी मित्राच्या
घरी आहे केक कापत!७!

३वर्षे झाली आज, मी
गुजरातला नोकरी करत आहे,
माझ्या प्रेमाशिवाय मी
एकाकी जीवन जगात आहे!८!

काल आठवण आली म्हणून
तिच्या घरी रिंग केली,
तिच्या आईकडून मला
वेगळीच बातमी कळली!९!

मी जायच्या दुसरया
दिवशीच ती आजारी पडली,
अन माझ्या विरहाच्या
तीव्र दुखानेच देवाघरी गेली!१०!

तिचे अव्यक्त शब्द कळलेच नाही
तिच्या मनातील भाव ओळखलेच नाही
तिच्या डोळ्यातील प्रेम जाणलेच नाही
म्हणून, मला प्रेम कधी जमलेच नाही!११!
मला प्रेम कधी जमलेच नाही.......!!!

Heart touching Love Story in Marathi


लाख वाटल लपवाव जगापासुन या मनाला
तरीही आज तुझी कहाणी कळाली या जगाला
सगळ्यांनी वाचल दुःखं या प्रत्येक शब्दांतुन
काय लपवु राहीलयं काय आता लपवायला.

लाख मन सागंत होत कुठेतरी थाबांयला
वळण निघुन गेली नाही जमल वळायला
सारेच धावले एकदम सुखाच्या मागे
मी काय करु मला नाही जमल पळायला.

आज काय झाल तुला उगाच असं रडायला
कुठे चुकल्यासारखं नाही ना वाटत मनाला
अशी कीती सुखं तुझ्या पदरात पडली
जी कारणं होती तुझी तेव्हा मला सोडायला.

आजही कुठे जमतय मला तस जगायला
एक वणवा कमीच होती मला जळायला
कालच्या पुरातून कसाबसा वाचलो मी पण
डोळ्यातल्या पाण्यात नाही जमत पोहायला.

What is Interest for Saving Account from GOVT Bank


सेव्हिंग अकाउंटवरील व्याजदर नियंत्रण मुक्त करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने नुकताच घेतला . याचा फायदा सेव्हिंग अकाउंटवर रक्कम अधिक काळ ठेवणाऱ्यांना होण्याची शक्यता बँकिंग तज्ज्ञांनी वर्तविली आहे . रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे स्पर्धा वाढणार आहे . सेव्हिंग अकाउंटवर अर्धा ते एक टक्का अधिक व्याज मिळण्याची शक्यताही वर्तविली जात आहे . अधिक ग्राहक मिळविण्यासाठी बँकांकडून वाढीव व्याजदराचे गाजर ग्राहकांना दाखविले जाण्याची शक्यता आहे . 

महागाई आणि आपण


दूध, साखर आणि तूप यांच्या किमती वाढल्या आहेत. दिवाळी तोंडावर आली असल्याने विविध प्रकारचे गोड आणि तिखट पदार्थांची रेलचेल असेल. अशा ऐन मोक्याच्या वेळी महागाईचे सावट निर्माण झाले आहे. वाढत्या चलनदरामुळे यंदाचा सण महागडा ठरण्याची शक्यता आहे. एकंदरित वस्तू आणि सेवांचे दर वाढत आहेत. महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी रिर्झव्ह बँक प्रमुख व्याजदरात वाढ करण्याचे आक्रमक धोरण अवलंबत आहे.

' होलसेल प्राइस इंडेक्स' 'कन्झ्युमर प्राइस इंडेक्स' आणि अन्नधान्यातील चलदरवाढ हे चलदरवाढीचे तीन आयाम आहेत. चलनदरवाढीतून पैशांचे मूल्य प्रतित होते. विविध कमॉडिजीवरून ते मोजले जाते. अन्नधान्य हा त्यातला एक भाग झाला. बाकीच्या घटकांचे भाव घसरले आणि अन्नधान्याच्या किमती वाढ होत तराहिली तरी चलनदरात एकंदर घट दिसून येईल. विशिष्ट कालावधीत किती वाढ झाली ते मोजले जाते. जसे की, गेल्या वषीर् एक किलो टॉमेटोचा दर ३० रुपये असेल आणि यंदा तो ३२ रुपये झाला असेल तर चलनदरातील वाढ ६.६६ टक्के असू शकते.

ग्राहकांवरील परिणाम

अन्नधान्यासारख्या प्राथमिक गरजांसाठीची मागणी किमतीच्या बाबतीत अलवचिक असते. म्हणजे, वाढत्या किमतीचा मागणीवर फारसा परिणाम होत नाही. या गरजांमध्ये एका मर्यादेच्या पुढे कपात करता येत नसल्याने अन्नधान्याच्या किमती वाढल्या तरी त्यावर खर्च करावाच लागतो आणि त्यामुळे आपल्या बचतीवर परिणाम होतो.

Thursday, October 20, 2011

My Love Story in Marathi


६ लाच आला फोन जिग-याचा , "जरा बोलायचंय तुझ्याशी , बसायचंऽ का ? "
मी : "ठीक आहे ". काम तर नव्हतं आता काहीहीऽऽऽ....

गेलो जवळच्याच BAR मध्ये, कोप-यातच बसलो
जिग-या : काय घेणार ? , मी : चालेल यार , Whisky ,Vodka काहीहीऽऽऽ....

Order दिली. RC ,सोडा . ग्लास भरला
सुचत नव्हतं आता काहीहीऽऽऽ....

ब-याच दिवसानंतर बसलो होतो
पहिलाच पेग "Top to Bottom ". ऐकणार नव्हतो आता काहीहीऽऽऽ....

दोन पेग झाले , "Gold Flake " सुलगावली
हं.. आता बोल काहीहीऽऽऽ....

जिग-या : तुझी ती भेटली होती , लग्न झालं तिचं.
मी : अरेऽऽ , यार काय म्हणतॊस ? माहित नाही काहीहीऽऽऽ....

जिग-या : अरे , Facebook वर बघितले नाही का ?
फोटो टाकलेत इकडचे तिकडचे ....काहीहीऽऽऽ....

मी : च्यायला .. मनातलं मनातच राहिलं
बोललोच नाही तिला काहीहीऽऽऽ....

मी : तिचं होतं यार माझ्यावर .. मला माहितेय
जरी बोलली नाही ती काहीहीऽऽऽ....

मी : खूप प्रयत्न केला होता बोलायचा
पण जमलंच नाही यार काहीहीऽऽऽ....

जिग-या : मला माहितेय यार. सोड आता. ती एकच आहे का या जगात ?
मनात आणू नकोस आता विचार काहीहीऽऽऽ....

मी : पण असं कसं विसरणार तिला , पहिलं प्रेम माझं
तुला नाही कळणार यार , माझ्या मनातलं काहीही....

मी : अरे आपले कवी म्हणतात ना
" प्रेम कर भिल्लासारखं बाणा वरती खोचलेलं"

जिग-या : पण बाण एकाच "दिला" वर मारायचाय
हे म्हणाले नाहीत काहीहीऽऽऽ....

जिग-या : यार आपल्याला एवढंच कळतं
आपली हीच प्रेयसी - ग्लासातली ..
भर पुढचा पेग , होऊ दे "Cheers"
तुझ्या लव्हसाठी , प्रेमासाठी वैगरे .. काहीहीऽऽऽ....

एक "Quarter" झाल्यानंतर आलो खरा शुद्धीवर
ठरवलंच , पुन्हा नाही आता प्रेम वैगरे .. काहीहीऽऽऽ....

Famous Lakshmikant Berde Songs Collection

Famous marathi actor Lakshmikant Berde popular Marathi songs collection watch Live video in this site with 1200 Lakshmikant Berde Video famous collection Below..
Funny Lakshmikant Berde songs 




Famous Lakshmikant Berde Songs Collection 
Prem Kalis Tu Maajhi Jahalis - Laxmikant Berde, Maskari Song
Old Famous Lakshmikant Berde Songs Collection 

Lovely Marathi Jokes for Christmas


मुलगी:- आपण लग्न कधी करायचे?
मुलगा:- घरी विचारूनसांगतो.
मुलगी:- तुझे माझ्यावर जास्त प्रेम आहे कि घरच्यांवर?
मुलगा:- घरच्यांवर
मुलगी:- का?
... ... मुलगा:- मी जेव्हा लहान होतो तेव्हा, चालताना पडलो कि आई उचलयाची, बाहेर
जायचो तेव्हा पप्पा बोट पकडायचे, रडायला लागलो तर ताई आणि दादा त्यांची
खेळणी द्यायचे. कळले का
मुलगी:- पण घरातून बाहेर पडल्यावर त्यांच्या कडे न जाता माझ्याकडेच येतो ना रे माकडा.
:) :)

***********************************************


मनी असे ते स्वप्नी दिस ओठी मी हे आणू कसे
...माझी नववधू शब्दात मी हे सांगू कसे
निळे पाणी, निळे डोगर, हिरवे हिरवे रान,
.... चे नाव घेउन राखतो सर्वांचा मान
काही शब्द येतात ओठातून
काही येतात गळ्यातून
राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून
भाजित भाजि पालक,
...माझि मालकिन अन् मि मालक !
खोक्यात खोका टि वी चा खोका,
खोक्यात खोका टि वी चा खोका
.......माझी मांजर मि बोका..
उमाचा महादेव आणि सितेचा राम
... आलि जीवनी आता आयुषयभर आराम
पुणे तेथे नाही काही उणे,
.... गेले गावाला तर घर होते सुणेसुणे
अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला,
....चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला
मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी
पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
........ ची व माझी जडली प्रिती

Tuesday, October 11, 2011

Marathi Happy New Year SMS for Girl Friend 2011

Marathi Happy New Year SMS for Girlfriend 2011

एक प्रेमीयुगुल आत्महत्या करायचं ठरवतात, मुलगा पहिले उडी मारतो, पोरगी डोळे मिटते, आणि मागे फिरते.....ते बघून पोरगा पाठीवरचं पॅरेशूट उघडतो आणि म्हणतो, साली चेटकीण मला माहित होत ही उडी नाही मारणार ..............
.
.
त्या दिवसापासून लोकं म्हणू लागले

......LADIES FIRST..

-------------------

तुझ्याविना दिवस माझे
काही केल्या सरत नाही
किती समजावाले स्वतःला
तरी अश्रू काही थांबत नाही .

-------------------------------------

प्रत्येक अश्रुचा अर्थ दुःख होत नाही. विरहाने प्रेम कमी होत नाही वेळी अवेळी डोळे ओले होतात कारण कांदा कापल्याशिवाय भाजी होत नाही.

-----------------------------------------


What is Love Definition in Marathi

हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी
आणि लग्न होणार असलेल्यांनी ......

नक्कीच वाचा: विचार करा.

एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच.

जेवताना मी तिचा हात हातात

घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."

तिच्या डोळ्यांत वेदना उमटली;

तरीही ती शांतपणे जेवत होती,

सगळे शब्द जुळवून मी तीला सांगितलं,

मला घटस्पोट हवाय."

तिने शांतपणे विचारल,- "का?"

तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली.

समोरच ताट तिने भिरकावून दिलं.

लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे,

हे तिल जाणून घ्यायचं होत;

पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलय हे मि तिला

स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो.

माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं:

पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.

दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.

तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि

या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती.....

तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती

आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता.

तिची आणखी एक अट होती.

लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत.

त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती.

मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.

घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता.

त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो.

मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने

बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.

दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती.

आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस

नित बघितलेच नाही हे मला जाणवलं;

आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला.

आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय,

असा प्रश्न पडला.

त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं.

रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां

हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.

दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन

माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच

पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना

नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.

आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती.

जी परत आयुष्यात येत होती.

महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला.

माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले.

ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच नव्हते.

माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.

मी वेगाने CAR चालवत घरी आलो.

माझ्या चेहऱ्यावर हसू होत.

हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो,

तर... माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती.

मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो.

माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता.

ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.

जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही.

आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.

पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.

महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.

वाचा आणि विचार करा. स्वताला विचारा --- "

आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"

या कहाणीचा एकच संदेश आहे.---

" जे आहे-- जे प्रेमात आहे,

जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.

नाही तर पश्याताप...

"आपण किती जरी नाही म्हणालो तरी आपण प्रेमात आंधळे होतोच, तसे आंधळे राहू नका... सावध राहा..कधी काही हि घडू शकत ..!