Thursday, August 11, 2011

Funny Marathi Interview Jokes


एका कंपनीमध्ये इण्टरव्ह्यू सुरू होते. गंपू तिथे इण्टरव्ह्यू देण्यासाठी पोहोचला. 


एचआर मॅनेजर : जगातल्या तीन महान व्यक्तीमत्त्वांची नावं सांगा. 


गंपू : अब्राहम लिंकन, महात्मा गांधी...आणि साहेब तुमचं नाव काय? 


गंपूला लगेचच नोकरी मिळाली

Funny Father Jokes in Marathi 2011


गंपू घरात लोळत बसलेला असतो. 


वडील : अरे, जा.. नोकरी धंदा कर काही तरी! 


गंपू : कशाला? 


वडील : अरे, त्याने तुझं भविष्य सुखाचं होईल... तुला घरदार घेता येईल, गाडी घेता येईल. आराम करता येईल.... 


गंपू : मग आता मी काय वेगळं करतोय? 

Funny Marathi salesman jokes


एका कंपनीतल्या सेल्समनला त्याच्या उत्कृष्ट परफॉर्मन्सबद्दल 'बेस्ट सेल्समन'चं बक्षीस देण्यात आलं. त्याच्या परफॉर्मन्सचं रहस्य काय हे विचारल्यावर 


तो म्हणाला, 'मी जेव्हा एखाद्या घराची डोअरबेल वाजवतो तेव्हा कितीही वयाची स्त्री बाहेर आली तरी मी तिला विचारतो, हॅलो...तुमची मम्मी घरी आहे का?' 

American jokes in Marathi


मुलगी (वडिलांना) : सॉरी, डॅड काल माझं लग्न झालं, पण तुम्हाला बोलवायचं राहून गेलं.. 


वडिल : अगं, असू दे, पण पुढच्या लग्नावेळी मात्र, बोलवायला विसरू नकोस हं! 

Thursday, June 23, 2011

Funny Wife and Husband Jokes in Marathi


न वरा-बायकोमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. 


बायको : (रागाने) मी माझ्या आईचा सल्ला मानला असता आणि तुमच्याशी लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं. 


नवरा : काय...तुझ्या आईने माझ्याशी लग्न करू नको म्हणून सांगितलं होतं? 


बायको : नाही तर काय? 


नवरा : अरे देवा...आणि मी सासूबाईंना समजण्यात आतापर्यंत किती मोठी चूक करत होतो.