Showing posts with label Summer Marathi Jokes collection 2012. Show all posts
Showing posts with label Summer Marathi Jokes collection 2012. Show all posts

Wednesday, March 21, 2012

Summer Marathi Jokes collection 2012

मुलगा : ओ काका, कुल्फी कितीला आहे?

कुल्फीवाला : १०, २०, ३० रुपयांना..

मुलगा कुल्फी खातो, आणि घरी जायला निघतो.

कुल्फीवाला : अरे, पैसे दे की?

मुलगा : आई म्हणाली खा, प्या मजा करा... पण पैशाचा लाड नाही करायचा...!

==================================


राधाकाकू : माझा चिंटू ना, तेराव्या वर्षी एसएससीची परीक्षा पास झाला.

मनोरमाकाकू : हे तर काहीच नाही, माझा पप्पू तर नवव्या वर्षीच एसएससी पास झाला.

राधाकाकू : अहो, पण एवढ्या लवकर कसं काय?

मनोरमाकाकू : तो परीक्षेत आठवेळा नापास झाल्यावर नवव्या वर्षी पास झाला.

====================================


ज्योतिषी : तुझं नाव गंपू आहे?

गंपू : होय, महाराज!

ज्योतिषी : तू गांधी रोडवर राहतोस?

गंपू : होय.

ज्योतिषी : आज तू १० किलो तांदूळ विकत घेतलेस?

गंपू : महाराज, तुम्ही तर अंतर्यामी आहात...

ज्योतिषी : बालका, तुझी पत्रिका दाखव, रेशनकार्ड नाही!!