Showing posts with label Today Marathi Jokes Collection. Show all posts
Showing posts with label Today Marathi Jokes Collection. Show all posts

Tuesday, February 21, 2012

Today Marathi Jokes Collection

Today Marathi Jokes Collection  just update
--------------------------------------------

गंपू लंडनला जातो. तिथल्या एका हॉटेलमध्ये जातो.
त्याला कोंबडी खायची इच्छा होते, पण कोंबडीला इंग्रजीत काय म्हणतात, तेच त्याला आठवत नाही.
म्हणून तो म्हणतो, 'एग्ज मदर!'
------------------------------------

गंपू : अहो, एखादा लेडिज ड्रेस दाखवा. 

दुकानदार : हो साहेब...दाखवतो ना. पण आधी हे सांगा की बायकोसाठी घ्यायचाय की मग एखादा महागातला दाखवू? 
-----------------------------------------

गंपू : हाय! ओळखलं मला? 
मुलगी : नाही! 
गंपू : अगं, मी तोच आहे, ज्याला तू काल पण ओळखलं नव्हतंस!! 
--------------------------------

दोन मुलं दोन मुलींचा पाठलाग करत होती. 

त्या दोन्ही मुलींनी राखी घेतली आणि एकेकाच्या हाताला बांधली. एका मुलीने विचारलं, 'आता काय कराल?' 

मुलगा : मित्रा, तू माझ्या बहिणीशी लग्न कर, मी तुझ्या बहिणीशी करतो. 

------------------------
शिक्षक : तुझं व्याकरण कच्चं आहे... म्हणून तुला हे वाक्य दहा वेळा लिहून आणायला सांगितलं होतं... पण तू तर पाचच वेळा लिहून आणलंस. 

गंपू : माझं गणितही कच्चं आहे!!
------------------------------------------------------