एक माकड : (दुसऱ्या माकडाचा हात बघून) मला तुझ्या भविष्यात अंधार दिसतोय!
दुसरं माकड : का?
पहिलं माकड : तू पुढे माणूस बनणारेस!!
******************************************************
दोन माणसं काम करत असतात. एक खड्डा खणत असतो, दुसरा तो खड्डा भरत असतो. गंपू ते बघून अचंबित होतो. गंपू विचारतो, 'तुम्ही नेमकं काय करताय, समजलं नाही...
त्यातला एक जण उत्तर देतो, 'आमची तिघांची टीम आहे... तिसरा झाड लावणारा रजेवर आहे... पण म्हणून आम्ही आमचं काम थांबवलेलं नाही!!
************************************************
गंपूचा मुलगा : बाबा...आपल्या सोसायटीत स्विमिंग पूल बांधायचा. माझे मित्र तुमच्याकडे मदत मागायला येणार आहेत.
गंपू : ओके...त्यांना दोन बालद्या भरुन पाणी देऊन टाक.
**********************************************
No comments:
Post a Comment