दूध, साखर आणि तूप यांच्या किमती वाढल्या आहेत. दिवाळी तोंडावर आली असल्याने विविध प्रकारचे गोड आणि तिखट पदार्थांची रेलचेल असेल. अशा ऐन मोक्याच्या वेळी महागाईचे सावट निर्माण झाले आहे. वाढत्या चलनदरामुळे यंदाचा सण महागडा ठरण्याची शक्यता आहे. एकंदरित वस्तू आणि सेवांचे दर वाढत आहेत. महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी रिर्झव्ह बँक प्रमुख व्याजदरात वाढ करण्याचे आक्रमक धोरण अवलंबत आहे.
' होलसेल प्राइस इंडेक्स' 'कन्झ्युमर प्राइस इंडेक्स' आणि अन्नधान्यातील चलदरवाढ हे चलदरवाढीचे तीन आयाम आहेत. चलनदरवाढीतून पैशांचे मूल्य प्रतित होते. विविध कमॉडिजीवरून ते मोजले जाते. अन्नधान्य हा त्यातला एक भाग झाला. बाकीच्या घटकांचे भाव घसरले आणि अन्नधान्याच्या किमती वाढ होत तराहिली तरी चलनदरात एकंदर घट दिसून येईल. विशिष्ट कालावधीत किती वाढ झाली ते मोजले जाते. जसे की, गेल्या वषीर् एक किलो टॉमेटोचा दर ३० रुपये असेल आणि यंदा तो ३२ रुपये झाला असेल तर चलनदरातील वाढ ६.६६ टक्के असू शकते.
ग्राहकांवरील परिणाम
अन्नधान्यासारख्या प्राथमिक गरजांसाठीची मागणी किमतीच्या बाबतीत अलवचिक असते. म्हणजे, वाढत्या किमतीचा मागणीवर फारसा परिणाम होत नाही. या गरजांमध्ये एका मर्यादेच्या पुढे कपात करता येत नसल्याने अन्नधान्याच्या किमती वाढल्या तरी त्यावर खर्च करावाच लागतो आणि त्यामुळे आपल्या बचतीवर परिणाम होतो.
Source : Mahatimes.com
No comments:
Post a Comment