Wednesday, March 21, 2012

Latest Girls life quotes in Marathi

After married Girls life Hurt touching quotes 2012 collection read from this site.

... लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं
...
सरळ जाऊन बोलण्यापेक्ष इझी आणि बेटर असतं

गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं

घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं

लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतं ज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं

सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं

आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं

पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं

वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं

शक्य शक्य हातांमधून थथरणारा वर्ड असतं नुकतंच पंख फ़ुटलेलं क्युट क्युटबर्ड असतं

होपफ़ुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं!!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे ऍग्रीमेंट असतं

५०% सर्टन आणि ५०% चं जजमेन्ट असतं

ऑपोनन्टच्या स्ट्रॅटेजीवर पुढचंसगळं डिपेन्ड असतं

सगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा लेन्ड नसतं

हार्ट देऊन हार्ट घ्यायचं सरळ साधं बार्टर असतं!!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक ड्रीम असतं

लाईफ़च्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं

अर्धं अर्धं प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं

तिसयासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं.

Summer Marathi Jokes collection 2012

मुलगा : ओ काका, कुल्फी कितीला आहे?

कुल्फीवाला : १०, २०, ३० रुपयांना..

मुलगा कुल्फी खातो, आणि घरी जायला निघतो.

कुल्फीवाला : अरे, पैसे दे की?

मुलगा : आई म्हणाली खा, प्या मजा करा... पण पैशाचा लाड नाही करायचा...!

==================================


राधाकाकू : माझा चिंटू ना, तेराव्या वर्षी एसएससीची परीक्षा पास झाला.

मनोरमाकाकू : हे तर काहीच नाही, माझा पप्पू तर नवव्या वर्षीच एसएससी पास झाला.

राधाकाकू : अहो, पण एवढ्या लवकर कसं काय?

मनोरमाकाकू : तो परीक्षेत आठवेळा नापास झाल्यावर नवव्या वर्षी पास झाला.

====================================


ज्योतिषी : तुझं नाव गंपू आहे?

गंपू : होय, महाराज!

ज्योतिषी : तू गांधी रोडवर राहतोस?

गंपू : होय.

ज्योतिषी : आज तू १० किलो तांदूळ विकत घेतलेस?

गंपू : महाराज, तुम्ही तर अंतर्यामी आहात...

ज्योतिषी : बालका, तुझी पत्रिका दाखव, रेशनकार्ड नाही!!