ऑस्ट्रियात चक्क जगातील पहिले सेक्स कॉलेज सुरू झाले आहे.... सेक्स या सर्वांच्याच आवडीच्या विषयात डिप्लोमा कोर्स करण्याची संधी या कॉलेजमध्ये असून, संबंधित व्यक्तीने वयाची १६ वर्षे पूर्ण केलेली असावी, एवढीच माफक अट सेक्स कोर्ससाठी घालून देण्यात आली आहे.
आम्ही सेक्सचे शास्त्रोक्त ज्ञान देणार आहोत. या विषयावर सातत्याने होणारे संशोधन, सेक्स टीप्स याबाबतची माहिती देणार आहोत, असे कॉलेजच्या प्राचार्या वाय. एम. थॉम्पसन यांनी सांगितले. कोर्ससाठी आम्ही विशेष पुस्तके तयार केली आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला ही सुमारे १.२ लाख रुपयांची पुस्तके विकत घ्यावी लागतील, असेही त्या म्हणाल्या.
Source : ऑस्ट्रियात
No comments:
Post a Comment