इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन' (ईटीआयएम) योजनेतंर्गत 'स्मार्ट कार्ड' योजनेचा शुभारंभ गुरूवारी झाला. चार आणि सात दिवसांचे पास घेणा-या प्रवाशांसाठी ही स्मार्ट कार्ड योजना राबवण्यात आली असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने विद्यार्थी, मासिक, त्रैमासिक पास आदींसाठी ती लागू करण्यात येणार आहे.
या स्मार्ट कार्डमुळे कागदी पास फाटणे, खराब होणे किंवा त्याचे दुरुपयोग होण्याचे प्रमाण पूर्णपणे टळणार आहे. त्याउलट स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांनाही ते सांभाळणे अधिक सोपे जाणार आहे. सध्या ही योजना 'आवडेल तिथे प्रवास' (चार किंवा सात दिवस प्रवास) करणा-या प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. स्मार्ट कार्डसाठी २५ रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार.
Source : maharashtratimes.indiatimes.com
Source : maharashtratimes.indiatimes.com
No comments:
Post a Comment