Monday, December 5, 2011

ओरिजिनल मोबाइल कसा ओळखायचा? How to find Original Mobile

How to find Original Mobile

मला सॅमसंग वेव्ह ५७५ थ्रीजी हा मोबाइल घ्यायचा आहे. मला ३.२ मेगापिक्सेल कॅमेरा, थ्रीडी साऊंड आणि थ्रीजी हेच हवे आहे. हा मोबाइल खरच चांगला आहे का? तसेच तो ओरिजिनल कंपनीचाच आहे हे कसे ठरवू शकतो? मोबाइल घेताना बिलासंदर्भात कोणती काळजी घेऊ?

Best Ans : या मोबाइलचा परफॉर्मन्स चांगला आहे. अद्याप कोणत्याही प्रकारच्या तक्रारीची नोंद नाही. यामुळे तुम्हाला आवडला असेल तर हा घेण्यास काहीच ना नाही. मोबाइल ओरिजिनल कंपनीचा आहे का? हे तपासण्यासाठी तुम्ही आयएमईआय नंबर व्हेरिफाय करणे गरजेचे आहे. तुमच्या मोबाइलवर *प्त०६प्त टाइप केलं की, तुम्हाला १५ आकडी आयएमईआयनंबर मिळेल. हा नंबर मेसेजमध्ये टाइप करून तो ५३२३२ किंवा ५७८८६ वर एसएमएस करा. यानंतर तुम्हाला आयएमईआय नंबर चेक फोन इज जेन्युइन सॅमसंग फोन असा मेसेज येईल. जर तो मोबाइल ओरिजिनल नसेल, चोरलेला असेल, सेकंड हॅण्ड असेल तर त्या संदर्भातील माहिती मिळेल. बिल घेताना पक्के बिल घ्या. त्यावर दुकानदाराचा व्हॅट नोंदणी क्रमांक असल्याची खात्री करा. रकमेवर व्हॅट लावलाय का ते तपासा आणि बिलावर बॉक्सवरील मॉडेल नंबर, आयएमईआय नंबर लिहून घ्या.

Link from Mata

No comments:

Post a Comment