Are you agree for FDI ?
किराणा मालासह रिटेल उद्योगात विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. या संदर्भात बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी संसदेत अधिकृत घोषणा करतील. मुखर्जी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांना फोन करुन ही माहिती दिली. याआधी केंद्रातील प्रमुख घटक पक्ष असलेल्या तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये मीडियापुढे एक घोषणा करुन सरकार रिटेलप्रश्नी माघार घेणार असल्याचे जाहीर केले होते.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून काम ठप्प झाले होते. भ्रष्टाचार आणि रिटेलमधील विदेशी गुंतवणुकीच्या मुद्यावरुन विरोधकांनी कामकाज बंद पाडले होते. केंद्र सरकारने वारंवार बैठका घेऊन देखील तोडगा निघत नव्हता. त्यामुळे संपूर्ण अधिवेशन चर्चेविना संपण्याचा धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर अखेर केंद्र सरकारनेच माघार घेतली आहे.
विरोधक आणि सहकारी घटक पक्षांच्या दबावामुळे काँग्रेसने आपल्या भूमिकेत बदल करत रिटेल उद्योगातील विदेशी गुंतवणूक लांबणीवर टाकली आहे. चार दिवसांच्या सुटीनंतर बुधवारी संसदचे अधिवेशन पुन्हा सुरू होत आहे. त्यावेळी अर्थमंत्री रिटेलप्रश्नी सरकारची नवी अधिकृत भूमिका जाहीर करतील.
Source : Maharashtra.indiatimes.com

No comments:
Post a Comment