एका सुपरस्टार हिरोची मुलगी खरिना शाळेत शिकत होती. एकदा बाईंनी सांगितलं, गरीबीवर निबंध लिहा.
खरिनाने निबंध लिहिला...
एक जुना बंगला होता. त्यात एक गरीब माणूस राहत होता. त्याची बायको पण गरीब होती. त्याची मुलं तर खूपच गरीब होती. त्यांच्याकडच्या सगळ्या पाचही गाड्या जुन्या झाल्या होत्या. त्या बंगल्यात काम करणारे नोकर, स्वयंपाकी, माळी, ड्रायव्हर, रखवालदार हेसुद्धा गरीब होते आणि त्यांची गरीबी तर पाहवत नव्हती.
No comments:
Post a Comment